मोठी बातमी! शिक्षण खात्यातील ‘त्या’च फाईल गायब? प्रकरण समोर येताच…
शिक्षण मंडळातील कथित फाईल गायब प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाने गुरुवारी जोरदार आंदोलन केले. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तसेच शिक्षण मंडळ कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले. विकासकामे रखडल्याचा आणि शिक्षण मंडळाचा कारभार निष्काळजीपणे सुरू असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काही कार्यकर्ते महापालिकेच्या प्रवेशद्वारावर चढल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील कथित फाईल गायब प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाने गुरुवारी जोरदार आंदोलन केले. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तसेच शिक्षण मंडळ कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले. विकासकामे रखडल्याचा आणि शिक्षण मंडळाचा कारभार निष्काळजीपणे सुरू असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काही कार्यकर्ते महापालिकेच्या प्रवेशद्वारावर चढल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या आंदोलनाबाबत माहिती देताना शिवसेनेचे नाना भानगिरे यांनी शिक्षण मंडळातील फाईल गायब झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आयुक्तांनी टेंडरला परवानगी दिल्यानंतर 7 तारखेला संबंधित फाईल शिक्षण मंडळात आली आणि त्याच दिवशी तिची इनवर्ड नोंद झाली. मात्र दुपारी 2.20 वाजता ती फाईल चोरीला गेल्याचा दावा त्यांनी केला.
“फुटेज मिळत नाही, पत्रव्यवहार मिळत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही,” असे नाना भानगिरे यांनी स्पष्टपणे म्हटले. या प्रकरणामुळे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
