पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील… थरकाप उडवणारे दृश्य समोर

पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील… थरकाप उडवणारे दृश्य समोर

| Updated on: Jul 06, 2026 | 4:26 PM

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे पाटण गावात मोठी दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे पाटण गावात मोठी दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून 23 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. मात्र, अजूनही एक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिक, प्रशासन आणि NDRF चे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून ढिगारा हटवण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. दरडीखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, रस्ते बंद होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना समोर येत आहेत. पाटण गावातील या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Published on: Jul 06, 2026 4:26 PM
Follow Us