निकालाला अवघा अर्धा तास बाकी, त्या आधीच धंगेकर यांचं मोठं विधान
राज्यातील 29 महापालिकांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. आज निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेचा सुध्दा समावेश आहे. मतदानाचा टक्का काहीसा कमी आहे. थोड्याचवेळात मतमोजणीला सुरूवात होईल. अवघ्या काही वेळाने पुण्याचा कारभार नक्की कोणाच्या हातात जाणार हे ठरणार आहे?
राज्यातील 29 महापालिकांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. आज निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेचा सुध्दा समावेश आहे. मतदानाचा टक्का काहीसा कमी आहे. थोड्याचवेळात मतमोजणीला सुरूवात होईल. अवघ्या काही वेळाने पुण्याचा कारभार नक्की कोणाच्या हातात जाणार हे ठरणार आहे? यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणूक लढले. एकनाथ शिंदेंकडे बघून लोकं शिवसेनेच्या पदरात यश पाडणार आणि योग्य लोकांच्या हातात पुणेकर सत्ता देणार असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केला आहे. शिवसेना निर्णायक ठरणार आणि शिवसेनेची नोंद यामध्ये घेतली जाणार असा ठाम विश्वास रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

