Devendra Fadnavis | एकामागून एक मृत्यू… पुण्यातील विषारी दारूकांडावर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा, म्हणाले….
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं असून या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या दोन दिवसांत विषारी दारूमुळे तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं असून या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या दोन दिवसांत विषारी दारूमुळे तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. “या प्रकरणात कोणतीही हयगय करू नका. एकही आरोपी सुटता कामा नये. कठोर कारवाई करा,” असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
विषारी दारू प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग संयुक्त कारवाई करत आहेत. अनेक ठिकाणी रात्रीभर छापेमारी करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंग याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह आणखी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, मृत्यूंच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय आणि तांत्रिक तपासही सुरू करण्यात आला आहे. विषारी दारू नेमकी कुठे तयार करण्यात आली आणि तिचा पुरवठा कुठून झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या भीषण घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
Published on: May 29, 2026 12:21 PM
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
बाळाल घेऊन तो निघाला, टोकाचं पाऊल उचलणार पण...शिवसेनेच्या
अंधाधुंद गोळीबार! मध्यरात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयंकर घडलं;
सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर?

