Pune Crime Video : … अन् स्वारगेट प्रकरणातील आरोपी थोडक्यात बचावला, 3 दिवसांत तीनदा आत्महत्येचा प्रयत्न? आधी विषारी…
पोलिसांनी चारही बाजूने घेराव घालून मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास आरोपीला बेड्या ठोकल्या. दरम्यान, या आरोपीसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.
पुणे स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या अखेर मुसक्या अवळण्यात आल्यात. गेल्या तीन दिवसांपासून फरार असलेला आरोपी शिरूर येथील गुनाट गावातील शेतात लपला होता. पोलिसांनी चारही बाजूने घेराव घालून मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास आरोपीला बेड्या ठोकल्या. दरम्यान, या आरोपीसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याने गेल्या दिवसात तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. आधी विषारी कीटकनाशक औषध पिऊन आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती सूत्रांनी दिली. तर मात्र गळफास घेत असताना दोरी तुटल्याने आरोपी गाडे हा थोडक्यात बचावला असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. दरम्यान, तब्बल 70 तास सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. काल दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. रात्री. 11.45 च्या सुमारास आरोपी गाडे हा एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता. तो ज्या घरात पाणी प्यायला, त्या घरातील महिलेने पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
