दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद

दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद

| Updated on: Oct 12, 2026 | 6:37 PM

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीत मतचोर गद्दी छोडो घोषणा देत सर्वोच्च न्यायालयाकडे मोर्चा काढला. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, हे आंदोलन लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी आहे.

राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी आज दिल्लीत जनआक्रोश महामोर्चा काढला. मंडी हाऊस चौकात जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांसह हा मोर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने निघाला होता. या आंदोलनामागचा मुख्य उद्देश ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे आणि भारतीय लोकशाही तसेच संविधानाचे रक्षण करणे हा होता. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतेही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

राहुल गांधींनी सकाळीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले होते. मुख्य न्यायमूर्तींनी भेटीची वेळ न दिल्याने रीतसर याचिका दाखल करण्याचे आवाहन केले होते. काँग्रेसची कायदेशीर टीम ही याचिका दाखल करणार आहे. आंदोलकांनी मतचोर गद्दी छोडो अशा घोषणा दिल्या. या मोहिमेत देशभरातील विविध राज्यांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त तैनात असून, सर्वोच्च न्यायालयाकडे जाणारे रस्ते बॅरिकेड्स लावून रोखण्यात आले होते, तरीही आंदोलक सुप्रीम कोर्टाच्या दिशेने पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते.

Published on: Oct 12, 2026 6:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us