पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

| Updated on: Jun 04, 2026 | 1:19 PM

इराण आणि अमेरिका यांच्याती वाढत्या तणावामुळे जगभरात इंधन संटक निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय अनेक देशांना दरवाढीमुळे आर्थिक संकटाला समोरे जावं लागत आहे.अशात महागाई तसेच इंधन टंचाईबाबत वाद-विवाद सुरु आहेत

इराण आणि अमेरिका यांच्याती वाढत्या तणावामुळे जगभरात इंधन संटक निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय अनेक देशांना दरवाढीमुळे आर्थिक संकटाला समोरे जावं लागत आहे.अशात महागाई तसेच इंधन टंचाईबाबत वाद-विवाद सुरु आहेत. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आर्थिक संकटाबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे.

राहुल गांधी म्हणाले, देशावर भयंकर अशी आर्थिक त्सुनामी येऊ शकते. इतकं मोठं आर्थिक संकट तुम्ही आयुष्यभरात पाहिलं नसेल असा दावा त्यांनी केला. पुढे ते म्हणाले त्यामुळे मला असं वाटत आहे की पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान नसतील.

पंतप्रधानांच्या भेटीचा किस्सा सांगत राहुल गांधी म्हणाले, “पूर्वी व्यवस्था पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात होती, पण आता ती त्यांच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. त्याच्याशी भेटी दरम्यान ते शंकेने पाहत असतात. माझ्याकडे मोदींबद्दल बरीच माहिती आहे. त्यांना वाटते की माझ्या नियंत्रणाखाली असलेली व्यवस्था कोलमडत आहे आणि हे सगळं मला माहित आहे. पुन्हा सांगतो माझ्या अंदाजानुसार, एका वर्षाच्या आत मोदी पंतप्रधान राहणार नाहीत.”

Published on: Jun 04, 2026 1:19 PM
Follow Us