Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप

Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप

| Updated on: Nov 13, 2026 | 12:19 PM

राज ठाकरे यांनी भाजपवर छठपूजेच्या मुद्द्यावरून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे फोडा आणि राज्य करा धोरण आता चालणार नाही, असे ते म्हणाले. मराठी माणसांनी भाजपच्या सापळ्यात अडकू नये, असे आवाहन करत त्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) छठपूजेच्या मुद्द्यावरून राज्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. भाजपचे फोडा आणि राज्य करा हे धोरण आता चालणार नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. मराठी माणसांनी भाजपच्या सापळ्यात अडकू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

राज ठाकरे यांच्या मते, भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया सध्या छठपूजेचा मुद्दा वापरून संघर्ष घडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. यासाठी सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकल्या जात आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्याचा प्रयत्नही झाला, जो मनसेने बंद पाडला असे राज ठाकरे यांनी नमूद केले. भाजपला अपेक्षित असलेला संघर्ष अजूनही उभा राहत नसल्याची खंत त्यांना आहे. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी हा सर्व आटापिटा सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. भाजपची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली असून, त्यांना आता कामे दाखवून निवडणुका जिंकता येत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

Published on: Nov 13, 2026 12:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us