AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shinde-Thackeray Meeting : शिंदे - ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?

Shinde-Thackeray Meeting : शिंदे – ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?

| Updated on: Apr 16, 2025 | 11:37 AM
Share

Eknath Shinde MNS Dinner Diplomacy : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सव्वातास चर्चा झाली. शिवतीर्थ निवासस्थानी हे दोन्ही नेते काल भेटले. आगामी पालिका निवडणुकीत मनसे आणि शिंदे सेनेची युती होण्याची शक्यता आहे. याच युतीवरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये डिनर डिप्लोमसी झाली का? अशा चर्चा आता रंगल्या आहेत. मंत्री उदय सामंत देखील शिंदे आणि ठाकरेंच्या या बैठकीत हजर होते.

आगामी मुंबई पालिका निवडणुकीत युतीच्या चर्चेची चिन्ह आता शिंदे आणि ठाकरेंच्या भेटीत दिसत. भाजपसह ठाकरेंची शिवसेना शिंदेंवर दबाव आणत असल्याची देखील चर्चा आहे. लोकसभेनंतर शिंदे आणि मनसेमध्ये मोठा दुरावा आला होता. काहीदिवसांपूर्वी राज ठाकरेंनी भाजप ऐवजी शिंदेंवर टीका केली होती. EVM वरून विधानसभा निकालावर राज ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. या मधल्या काळात झालेल्या वादानंतर शिंदे काल पहिल्यांदाच राज ठाकरे यांना भेटले. तर दुसरीकडे मनसे आणि भाजपमधील जवळीक कमी होऊन दुराव्यात वाढ झाली आहे. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी भाजपचे नेते आमच्याकडे मतांसाठी भीक मागतात असं विधान केलं होतं. तेव्हापासून मनसे – भाजपचे संबंध ताणले गेले. त्यामुळे एकनाथ शिंदेंची ही भेट महत्वाची मानली जाते आहे.

Published on: Apr 16, 2025 09:32 AM