Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा

Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा

| Updated on: Oct 28, 2026 | 2:30 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कर्जतमध्ये वृक्षतोडीविरोधात सभा घेणार आहेत. सकाळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि वृक्षतोड झालेल्या जागेची पाहणी केली. टॉरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी हजारों झाडे तोडण्यात आल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे सरकारवर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कर्जत येथे वृक्षतोडीविरोधात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सकाळी राज ठाकरे यांनी कर्जतमधील बाधित ग्रामस्थांशी संवाद साधत वृक्षतोड झालेल्या परिसराची पाहणी केली. त्यांच्यासोबत अमित ठाकरेही उपस्थित होते.

कर्जतमधील जंगलात टॉरेंट कंपनीच्या १३,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. जवळपास ३२,००० झाडे तोडण्याच्या मार्गावर होती, त्यापैकी २-३ हजार झाडे आधीच तोडण्यात आली आहेत. या वृक्षतोडीला स्थानिक नागरिकांकडून आणि मनसेकडून तीव्र विरोध झाल्याने ती तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली आहे. मात्र, प्रकल्प रद्द करण्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक पवित्रा घेत ही सभा आयोजित केली आहे. सायंकाळी ५ वाजता कर्जत पोलीस मैदानावर सह्याद्री जागा हो या घोषणेखाली राज ठाकरे सरकारवर काय तोफ डागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Published on: Oct 28, 2026 2:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us