मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो… तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या रायगड दौऱ्यावर असून त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. पाहणीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महामार्गाच्या कामावर आणि तिसऱ्या मुंबईच्या नियोजनावर सरकारला प्रश्न विचारले.

महामार्गाच्या कामाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना केलेल्या फोनचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “मागे मी एकदा नितीन गडकरी यांना फोन केला होता. त्यांना विचारलं होतं. कंत्राटदार कंटाळून निघून गेले असे ते म्हणाले होते.” कंत्राटदार कोणामुळे आणि कशामुळे कंटाळले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी महामार्गाचे काम विकासासाठी की टक्केवारीसाठी, असा प्रश्न उपस्थित केला. “रस्ता जर बांधायचा असेल तर भूसंपादन सरकारने करून घ्यायचे असते,” असे त्यांनी सांगितले.
तिसऱ्या मुंबईबाबतही त्यांनी सरकारला धारेवर धरले. पेण, पनवेल आणि रायगडमधील स्थानिक तरुणांना कौशल्य आणि रोजगार मिळणार का, असा सवाल त्यांनी केला. “शहरं उभी करायची आणि वाट लावायची. जमिनी विकणे एवढाच एक धंदा सुरू आहे महाराष्ट्रात सध्या,” अशी टीका त्यांनी केली.