डोळ्यात पाणी अन्… tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक

डोळ्यात पाणी अन्… tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक

| Updated on: Jun 17, 2026 | 4:20 PM

नाशिकचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत भावूक होत आपली भूमिका स्पष्ट केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असून कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

राजाभाऊ वाजे म्हणाले की, आमदारकी आणि खासदारकी या येतात आणि जातात. मात्र, ठाकरे कुटुंबाने दिलेलं प्रेम आणि विश्वास आयुष्यात खूप मोठा आहे. जर कधी पक्ष सोडण्याची वेळ आली, तर त्या दिवशी आपण राजकारणातही राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले.

यावेळी खासदार संजय राऊत यांनीही राजाभाऊ वाजे यांच्या निष्ठेचे कौतुक केले. ते पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे राऊत म्हणाले. राजाभाऊ वाजे यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Jun 17, 2026 3:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us