पैसे मोजताना मी स्वतः… ‘मातोश्री’वरचा ‘तो’ किस्सा नारायण राणेंनी भरसभेत सांगितला

Harshada Shinkar | Updated on: May 05, 2024 | 4:52 PM

तुम्ही कोणाला गाडणार? आम्ही कृती करणारी माणसे आहोत, नुसतीच बोलणारी नाही, असा खोचक टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तळकोकणात काल नारायण राणे यांची मोठी जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला

खोक्याबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये. त्यांनी कधी खोके घेतले नाही? असा सवाल करताना नारायण राणे यांनी एक किस्सा जाहीर सभेत सांगितला. नारायण राणे म्हणाले, मी एके दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता मातोश्रीमध्ये गेलो होतो. साहेबांच्या केबिनमध्ये तीन माणसे पैसे मोजत होते. मी हे साहेबांच्या कानावर घातलं. उमेदवारी देताना त्यांच्याकडून पैसे घेत होते, असा गंभीर आरोपही राणेंनी केला. पुढे राणे म्हणाले, दमबिम द्यायचं काम तुमचं नाही. आम्ही सोडलं आणि तुमच्याकडे आलं असं काही नाही. म्हणे आडवे आलात तर गाडेल… तुम्ही कोणाला गाडणार? आम्ही कृती करणारी माणसे आहोत, नुसतीच बोलणारी नाही, असा खोचक टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तळकोकणात काल नारायण राणे यांची मोठी जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

Published on: May 05, 2024 4:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us