Kishori Pednekar | महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया चर्चेत

Kishori Pednekar | महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया चर्चेत

| Updated on: Mar 15, 2026 | 1:43 PM

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवर लावलेला लाल दिवा चर्चेचा विषय ठरला आहे. गाडीवर लाल दिवा लावण्याची परवानगी नसतानाही हा दिवा लावल्यामुळे रितू तावडेवर टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडेवर थेट टीका केली आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवर लावलेला लाल दिवा चर्चेचा विषय ठरला आहे. गाडीवर लाल दिवा लावण्याची परवानगी नसतानाही हा दिवा लावल्यामुळे रितू तावडेवर टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडेवर थेट टीका केली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महापौरांच्या गाडीवरील लाल दिवे नियमांचे पालन करत काढण्यात आले आहेत आणि सध्या त्यांच्या गाडीवर कोणतेही विशेष दिवे नसल्याचे सांगण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, 2017 मध्ये या विषयावर मोठी चर्चा झाली होती आणि त्यानंतर अशा गाड्यांवर लाल निळे दिवे लावण्यावर बंदी आली. त्यांनी स्वत: महापौर असताना नियमांचे पालन केले आणि कोणत्याही विशेष सुविधा घेतल्या नाहीत. पेडणेकर यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, महापौरांनी दिवा लावण्याआधी प्रोटोकॉल विचारले का? आणि कोणाच्या सांगण्यावरून दिवा लावला गेला? तसेच, मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती दिलेल्या बदलांचे आदेश काढण्याचे अधिकार आहेत का?, असे सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केले आहेत.

Published on: Mar 15, 2026 01:43 PM
Follow Us