‘तो’ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे आक्रमक; नमाज पठणाविरोधात करणार महाआरती

| Updated on: Jul 08, 2023 | 12:13 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. तसेच येथे त्या प्रकरणावरून चांगलेच वातावरण तापलं असून मनसे त्या कृतीविरोधात पनवेल रेल्वे स्टेशनवर महाआरती करणार आहे.

Follow us on

पनवेल : राज्यातील धार्मिक वातारण अजूनही अशांत असतानाच आता पनवेल रेल्वे स्टेशनमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. तसेच येथे त्या प्रकरणावरून चांगलेच वातावरण तापलं असून मनसे त्या कृतीविरोधात पनवेल रेल्वे स्टेशनवर महाआरती करणार आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पनवेल रेल्वेस्टेशनवर काही मुस्लिम बांधव नमाज पठण करत असतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर पनवेलमधील मनसेने आक्षेप घेतला आहे. तसेच जर स्टेशनवर मुस्लिम बांधव नमाज पठण करत असतील तर काही हिंदू सुद्धा तिथे महा आरती करणार असा इशारा मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी दिला. तर सायंकाळी साडेसहा वाजता पनवेल रेल्वे स्थेशनवर मनसे कार्यकर्त्यांकडून महाआरती करण्यात येणार असल्याचंही मनसेकडून सांगण्यात आलं आहे.