Special Report | मनसेच्या ‘नवसंजीवनी’ला पुन्हा गळतीचं ग्रहण ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर येण्यापूर्वीच रुपाली पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आता रुपाली पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता पाटील या हाती घड्याळ बांधणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित पाटील यांचा उद्या मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय.
पुणे : शहरातील मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) फायरब्रँड नेत्या अशी ओळख असलेल्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी आता मनसेला अखेर जय महाराष्ट्र केला आहे. पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत त्याबाबत घोषणा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर येण्यापूर्वीच रुपाली पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आता रुपाली पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता पाटील या हाती घड्याळ बांधणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित पाटील यांचा उद्या मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय.
