मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच…
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या पाठिंब्याने उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात नाराजीचे वातावरण होते. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सचिन अहीर यांची उपसभापती पदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात अनेक मोठे नेते उपस्थित हाणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा सोहळा त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच वरळीत आयोजीत केला जाणार आहे.
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे हे उद्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वरळीतील विविध विकासकामांची पाहणी तसेच सचिन अहीर यांच्या सत्कार कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत. श्रीकांत शिंदे आणि शिंदे गटातील अनेक नेतेही या दौऱ्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.