Sadabhau Khot : ‘पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले’, मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे आमदार सदाभाऊ खोत यांनी आपली तीव्र नाराजी आणि खदखद जाहीरपणे व्यक्त केली आहे. पक्षामध्ये बाहेरून आलेले काही सरदार मंत्री झाले, तर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या आणि निष्ठावान असलेल्यांना मात्र मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. “पक्षात हे सरदार आले, त्यांनी साहेबाच्या […]
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे आमदार सदाभाऊ खोत यांनी आपली तीव्र नाराजी आणि खदखद जाहीरपणे व्यक्त केली आहे. पक्षामध्ये बाहेरून आलेले काही सरदार मंत्री झाले, तर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या आणि निष्ठावान असलेल्यांना मात्र मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
“पक्षात हे सरदार आले, त्यांनी साहेबाच्या पायाला लागले आणि ते लगेच मंत्री झाले. तर आपण मात्र केवळ बघत बसलो. आपल्यावर ही काय वाईट वेळ आली आहे,” अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी आपली व्यथा मांडली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Aug 30, 2026 10:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
