Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात…नेमकी नवी माहिती काय?

Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात…नेमकी नवी माहिती काय?

| Updated on: Aug 01, 2026 | 5:22 PM

समता पतसंस्थेतील कथित बनावट खाते प्रकरणात आरोपी भोंदू खरात याला राहता न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणात समता पतसंस्थेत बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट खाते प्रकरणाच्या तपासासाठी शिर्डी पोलिसांनी भोंदू खरात याला ताब्यात घेतले असून, न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्याला राहता न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

तपासादरम्यान समता पतसंस्थेत तब्बल 57 व्यक्तींच्या नावावर सुमारे 100 खाती उघडण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, आर्थिक गैरव्यवहाराचा तपास अधिक गतीने सुरू आहे.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच बनावट खात्यांच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांचे नेमके स्वरूप काय आहे, याचा तपास पोलीस करत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Aug 01, 2026 5:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us