मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी: संभाजीनगरमधील सांगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर मृत कुणाल सांगुडेंच्या मावशी पल्लवी पाटील यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. “सत्य माहिती नसताना कुणाल आणि आमच्या कुटुंबाविषयी खोट्या अफवा पसरवू नका,” अशी त्यांनी विनंती केली. पल्लवी पाटील म्हणाल्या, संगीता सांगुडे या त्यांच्या मोठ्या बहिणी, कुणाल हा भाचा आणि मुरलीधर सांगुडे […]
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी: संभाजीनगरमधील सांगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर मृत कुणाल सांगुडेंच्या मावशी पल्लवी पाटील यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. “सत्य माहिती नसताना कुणाल आणि आमच्या कुटुंबाविषयी खोट्या अफवा पसरवू नका,” अशी त्यांनी विनंती केली.
पल्लवी पाटील म्हणाल्या, संगीता सांगुडे या त्यांच्या मोठ्या बहिणी, कुणाल हा भाचा आणि मुरलीधर सांगुडे हे मेहुणे होते. या तिघांना गमावल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याची वेदना फक्त कुटुंबालाच माहिती आहे.
केवळ मोबाईल न मिळाल्यामुळे कुणालने आई-वडिलांना टोकाचा निर्णय घेण्यास भाग पाडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र अशा दाव्यांना कोणताही आधार नसल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आणि अफवा न पसरवण्याचे आवाहन केले.
Published on: Aug 23, 2026 8:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
