हे आंडू, पांडू… XXX ऑफ द बॉस… संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले

हे आंडू, पांडू… XXX ऑफ द बॉस… संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले

| Updated on: Jun 28, 2026 | 1:51 PM

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज परभणी दौऱ्यावर असून त्यांनी सभेआधी बंडखोर खासदारांवर जोरदार निशाणा साधला. या दौऱ्यात खासदार संजय राऊत, अरविंद सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. परभणीत शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

यावेळी संजय राऊत यांनी आपल्या भाषणात बंडखोर नेत्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. “ “जगात जर्मनी आणि देशात परभणी का म्हणतात ते काल कळलं. उद्धव ठाकरे यांचं परभणीच्या वेशीवर आगमन होताच शिवसैनिकांनी गद्दारांचा निषेध केला. एल्गार केला. या परभणीत गद्दार टिकला नाही. त्यामुळे जगात फक्त परभणीच त्या मुंडक्याचं काय करायचं ते पाहू. ते मुंडकं राहत नाही. या परभणीत अनेक आंडू पांडू बंडू आले आणि गेले. शिवसेना मजबूतीने उभी आहे. आणि ती राहणार. हा स्वत:ला काय म्हणतो बंडू द बॉस. अरे गांडू द बॉस. बरोबर ना. या पुढे त्याला गांडू द बॉस म्हणायचं आहे.”. पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत 4 आमदार निवडून देण्याचे आवाहन केले.

“2029 मध्ये 100 आमदार निवडून आणून स्वतःच्या ताकदीवर सत्ता स्थापन करू. तेव्हा विकास काय असतो हे दाखवून देऊ,” असेही राऊत म्हणाले. तसेच “ऑपरेशन तुडवा” सुरू असल्याचे सांगत गद्दारांना धडा शिकवण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Published on: Jun 28, 2026 1:47 PM
Follow Us