गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, ‘पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!’

गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, ‘पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!’

| Updated on: Nov 05, 2026 | 11:00 AM

गोकुळ निवडणुकीतील पराभवानंतर सत्ताधाऱ्यांनी जनमताचा अनादर केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पराभव पचवता येत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही, अशी टीका राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे लोकशाही मूल्यांचे उल्लंघन करत असल्याचा दावा करत, ५.५ लाख शेतकऱ्यांचा कौल स्वीकारण्याचे आवाहन राऊत यांनी केले.

महाराष्ट्रातील गोकुळ निवडणुकीच्या निकालावरून राजकारण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. “पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करायची लायकी नाही,” असे सडेतोड विधान राऊत यांनी केले. गोकुळमध्ये समविचारी पॅनलला बहुमत मिळाल्यानंतरही पराभूत उमेदवारांना सत्तेवर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

राऊत यांच्या मते, हा लोकशाहीचा अनादर असून शेतकऱ्यांच्या भावनांशी बेईमानी आहे. ५.५ लाख शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आपले पॅनल निवडून दिले आहे. असे असतानाही त्यांचा कौल डावलून जर गुजरात लॉबीला गोकुळ विकण्याचा डाव सुरू असेल, तर ते महाराष्ट्राशी आणि शेतकऱ्यांशी गद्दारी करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या जनमताचा अनादर करण्याच्या या नवीन परंपरेची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

Published on: Nov 05, 2026 10:59 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us