Sanjay Raut : प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर लगेच दाऊदची संपत्ती मुक्त केली; संजय राऊतांची टीका
Sanjay Raut Press Conference In Nashik : शिवसेना उबठा गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर टीका केली आहे.
एका बाजूला तुम्ही दाऊद इब्राहीमची संपत्ती मुक्त करताय. त्याच्या संपत्तीला क्लीनचीट देता आहे. भाजप बरोबर गेलेल्या प्रफुल पटेल यांची संपत्ती ईडीने जप्त केली होती. त्या संपत्तीचा संबंध दाऊद सोबत असल्याच सांगून ती जप्त केली होती पण प्रफुल पटेल भाजपमध्ये जाताच तीच संपत्ती आता मुक्त केली आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. राहुल गांधी यांनी काल गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या अधिवेशनात बोलताना नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर तिथून ते दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच नॅशनल हेरॉल्डची संपत्ती जप्त करण्याची नोटिस काढण्यात आली. त्यावरून संजय राऊत यांनी ही टीका केली.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

