ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच… बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा

ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच… बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा

| Updated on: Aug 09, 2026 | 11:45 AM

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना कोणाची, याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचे विधान केले आहे.

संजय राऊत म्हणाले, “2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐऱ्यागैऱ्याकडे कशी जाऊ शकते?” त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार किंवा पक्षफुटीच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टावर अप्रत्यक्ष दबाव आणत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी याबाबत ठाम भूमिका मांडली असून ती चुकीची नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राऊत पुढे म्हणाले, “हे जे ठाण्याचे टिकेजीराव आहेत त्यांना परस्पर पक्ष दिलाय निवडणूक आयोगाने.” विधीमंडळातील आमदार सोडून गेले म्हणून पक्ष त्यांच्याकडे दिल्याचा दावा त्यांनी केला. राऊत यांनी विधीमंडळातील पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा असल्याचे सांगितले. “मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आहेत,” असे ते म्हणाले. या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

Published on: Aug 09, 2026 11:45 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us