Sanjay Raut | ‘तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी… संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ

Sanjay Raut | ‘तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी… संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ

| Updated on: Jun 16, 2026 | 10:52 AM

राज्याचं राजकारण सध्या तापल्याचं चित्र आहे, कारण ठाकरे गटातील काही खासदार लवकरच दुसरा गट स्थापन करणार अशी चर्चा रंगली आहे. ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती आणि शिंदेंच्या नेत्यांशी भेटीगाठी यावरून पक्षातील फुटीच्या चर्चांना जोर आला आहे.

राज्याचं राजकारण सध्या तापल्याचं चित्र आहे, कारण ठाकरे गटातील काही खासदार लवकरच दुसरा गट स्थापन करणार अशी चर्चा रंगली आहे. ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती आणि शिंदेंच्या नेत्यांशी भेटीगाठी यावरून पक्षातील फुटीच्या चर्चांना जोर आला आहे. आता शिवसेना (उबाठा) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. याबाबतीत बोलताना त्यांनी एक उदाहरण दिलं. त्या उदाहरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

यावेळी, ‘खासदार माध्यमांना न भेटता मागच्या दाराने निघून जातात. पक्ष नेतृत्वाने बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही पक्षाच्या बैठकीला पोहोचत नाही पण दिल्लीत मंत्र्यांच्या भेटीला जाता’, या पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत चिडले. “तुम्ही उलट तपासणी घेताय का? प्रश्न विचारा, तुम्ही उलट तपासणी नाही घ्यायची. पत्रकारांचे प्रश्न पत्रकारांसारखे विचारा. एक खासदार एका मंत्र्याला भेटला, त्यात एवढी आतडी पिळवटून विचारण्याची गरज काय?” असा उलटा सवाल राऊत यांनी केला. “उद्या मी पंतप्रधानांना भेटेन माझ्या कामासाठी. एखादं राष्ट्रहिताचं काम असेल तर पंतप्रधानांना मी भेटू शकतो. पंतप्रधान, मंत्री देशाचे आहेत, कुठल्या पक्षाचे नाहीत” असं बचाव करताना राऊत बोलले. यानंतर राऊतांच्या ‘राष्ट्रहिताच्या कामासाठी पंतप्रधानांना भेटेन’ या वाक्याची सर्वत्र चर्चा आहे.

Published on: Jun 16, 2026 10:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us