Sanjay Raut : पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; निवृत्तीच्या मुद्द्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची 75 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यामुळे ते त्यांनीच बनवलेल्या नियमाप्रमाणे निवृत्त होत आहेत, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आता वयाची 75 वर्ष पूर्ण करत आहेत, त्यामुळे त्यांना निवृत्त व्हावं लागतंय, पण हे फडणवीस ठरवणार नाहीत, असं शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, ‘ते म्हणतात संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. पण हा शोध त्यांनी कुठून लावला? संघ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय, यावर त्यांनी यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे. नरेंद्र मोदी आता वयाची 75 वर्ष पूर्ण करत आहे. त्यामुळे त्यांनीच बनवलेल्या नियमाप्रमाणे आता त्यांना निवृत्त व्हावं लागतं आहे. हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाही आहेत. त्यांना कितीही बोलूद्या. बाप जीवंत असताना वारसदार ठरवला जात नाही, ही मुघली संस्कृती आहे, असं फडणवीस म्हणतात. पण कोण बाप? कोणाचा बाप? ते देशाचा बाप नाही. मोदी हे पंतप्रधान आहेत. ती तात्पुरती व्यवस्था असते. भगवान राम आणि भगवान कृष्ण देखील आपलं अवतार कार्य संपल्यावर निघून गेले. तसंच मोदींचं सुद्धा आता अवतार कार्य संपलं आहे, असंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..

