राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? दीपक केसरकर यांचा सवाल ?
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचे खंडण दीपक केसरकर यांनी केले आहे.
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात हा तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खाते चालवत होता. त्यांच्या खात्यातील अनेक बदल्या आणि बढत्या खरात याच्या आदेशाने होत होत्या. आणि हॉटेल ट्रायडंट येथून बसून खरात बाबा त्यांच्या भक्त मंत्र्यांना आदेश द्यायाचा असे सनसनाटी आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. या आरोपांना आता शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे. अशोक खरात माझे खाते कसे काय चालवणार ? अशोक खरात एकदाही माझ्या कार्यालयात आलेला नाही.संजय राऊत यांचे हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. माझे डिपोर्टमेंट चांगल्या रितीने चालत नव्हते असे ते म्हणाले आहेत ते चुकीचे आहे त्यांनी हवी तर माहिती घ्यावी असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
Published on: Mar 21, 2026 5:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
