‘मातोश्री’ बंगल्यावरही बंगाली बाबा… विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलताना नेत्याचा मोठा खुलासा!
शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वादावर बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले. विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी पती गितेश राऊत आणि सासरे विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वादावर बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले. विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी पती गितेश राऊत आणि सासरे विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मारहाण, मानसिक त्रास आणि जादूटोणा केल्याचे आरोप केले आहेत.
या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून मध्यरात्री एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटातील संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या गटातील नेत्यांना अशा प्रकारे बोभाटा करण्याची सवय आहे. धक्कादायक म्हणजे चक्क, मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालमधील जादू बाबा येत असल्याचा दावाही त्यांनी केला. उबाठा नेते जादूटोण्याविरोधात बोलतात, मात्र स्वतःच भोंदूबाबांकडे जातात. या प्रकरणात सरकारने सुमोटो कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, संजय राऊत यांच्यावरही शिरसाट यांनी निशाणा साधला. संजय राऊत यांनी आधी स्वतःच्या पक्षाचे भविष्य सांगावे आणि इतरांच्या घरात डोकावून वाद निर्माण करू नयेत, असा टोला त्यांनी लगावला.
