‘दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार’, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

‘दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार’, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Harshada Shinkar | Updated on: Sep 30, 2024 | 4:59 PM

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नात्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

पुणे जिल्ह्याने आतापर्यंत अनेक पालकमंत्री पाहिले पण असं सुडाचं राजकारण कधी पाहिलं नाही, असं वक्तव्य करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला तर आपला, जो कोणी पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचा सन्मानच होईल, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. पुणे येथील भुकूम येथील दौऱ्यांत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘पुणे जिल्ह्याने आतापर्यंत अनेक पालकमंत्री पाहिले पण असं सुडाचं राजकारण कधी पाहिलं नाही. दीड दोन महिन्याचा विषय आहे आपलंच सरकार येणार आहे. जो कोणी पालकमंत्री होईल तो विरोधी पक्षाचा पण मान सन्मान ठेवेल. लोकशाही पद्धतीने आपलं सरकार चालवू’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Published on: Sep 30, 2024 4:59 PM
Follow Us