Sharad Pawar | खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली; पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉलमध्ये नेणार

Sharad Pawar | खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली; पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉलमध्ये नेणार

| Updated on: Feb 09, 2026 | 3:10 PM

खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली असून, सध्या ते बारामतीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगण्यात येत होते, मात्र आज त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने काळजी वाढली आहे. शरद पवार यांना ताप, खोकला आणि कफचा त्रास होत असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी डॉक्टरांची एक टीम सकाळीच बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाली होती.

खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली असून, सध्या ते बारामतीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगण्यात येत होते, मात्र आज त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने काळजी वाढली आहे. शरद पवार यांना ताप, खोकला आणि कफचा त्रास होत असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी डॉक्टरांची एक टीम सकाळीच बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाली होती. सकाळपासूनच त्यांना सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास वाढल्याने डॉक्टरांनी त्यांची सखोल तपासणी केली. त्यानंतर दुपारी पुन्हा एकदा डॉक्टरांची दुसरी टीम तपासणीसाठी दाखल झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी शरद पवार यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेण्याची तयारी करण्यात येत आहे. आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडणार असून, या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार होते. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Published on: Feb 09, 2026 03:10 PM