शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

| Updated on: Nov 26, 2026 | 3:45 PM

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्रांती न घेतल्याने त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. डॉक्टरांनी त्यांना प्रवासात कपात करून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असला तरी, शरद पवार कामात रमून जातात असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सध्या त्यांची तब्येत स्थिर असून ते दोन दिवस रुग्णालयात असतील.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. पवारांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पवारांना अॅडमिट केल्याचं कळताच खासदार सुप्रिया सुळे या तातडीने रुग्णालयात दाखल झाले. सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलही रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. प्रफुल्ल पटेल अचानक रुग्णालयात आल्याने मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात मोठ्या हालचालींना वेग येणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

सुप्रिया सुळे पवारांच्या भेटीला गेल्यानंतर काही वेळाने तिथे प्रफुल्ल पटेलही आले. यावेळी रुग्णालयात शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे. पवार वेगळा निर्णय घेणार तर नाही ना? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. रोहित पवारांचं बैठकीतच राहणं आणि पटेल यांचं शरद पवार यांच्या भेटीला जाणं यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मागच्यावेळी शरद पवार अॅडमिट असताना पटेल दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला गेले होते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस करत तुम्ही आराम करा, असा सल्ला दिला होता. त्यावेळीही राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आता परत या राजकीय चर्चांना फोडणी मिळाली आहे.

Published on: Nov 26, 2026 3:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us