सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या…

सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या…

| Updated on: Jun 30, 2026 | 1:52 PM

विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन आहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या पदासाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे उमेदवारी जाहीर होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सचिन आहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. या घडामोडीनंतर नीलम गोऱ्हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, त्यांनी स्वतः पुढे येत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

“मी अजिबात नाराज नाही,” असे स्पष्ट शब्दांत नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. सचिन आहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज भरल्याचेही त्यांनी नमूद केले. सातारा जिल्ह्यातील काही राजकीय घडामोडी आणि भाजपाच्या नाराजीमुळे गोऱ्हेंना फटका बसल्याची चर्चा सुरू होती. मात्र, यावर अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.

दरम्यान, आता पक्षाकडून नीलम गोऱ्हे यांच्यावर कोणती नवी जबाबदारी दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 30, 2026 1:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us