Sanjay Shirsat | गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन आणि गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली असताना, यावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गॅस किंवा पेट्रोलचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की, काही जण मुद्दामहून मुद्दे निर्माण करण्यासाठी गॅस तुटवड्याचा विषय उचलत आहेत.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन आणि गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली असताना, यावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गॅस किंवा पेट्रोलचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की, काही जण मुद्दामहून मुद्दे निर्माण करण्यासाठी गॅस तुटवड्याचा विषय उचलत आहेत. प्रत्यक्षात कुठेही गॅसची कमतरता जाणवत नाही आणि पेट्रोलचाही पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही लोक घबराट निर्माण करत असल्यामुळेच नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगा लावत असल्याचेही त्यांनी सांगितले. अनावश्यक भीती पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. अशा परिस्थितीत सरकारने हमी दिली असताना जनतेने सरकारवर विश्वास ठेवावा, असेही शिरसाट यांनी यावेळी नमूद केले.
Published on: Mar 11, 2026 06:15 PM
Follow Us
