मोठी बातमी! धनुष्यबाण कुणाचा? आज अंतिम लढत; सुप्रीम कोर्टात पुन्हा रंगणार युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हासंदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर पार पडणार आहे.
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर पार पडणार आहे.
आजच्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने वकील न्यायालयात युक्तिवाद मांडणार आहेत. यापूर्वी झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बंडखोरीच्या माध्यमातून पक्षावर दावा सांगणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर आघात असल्याचा युक्तिवाद केला होता.
शिवसेना पक्षावरील दावा आणि निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भातील हा वाद गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, आजच्या सुनावणीत होणाऱ्या युक्तिवादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रियेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आजच्या सुनावणीत न्यायालय कोणती भूमिका घेते याकडे राज्यभरातील राजकीय पक्ष आणि जनतेचे लक्ष लागले आहे.
