ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर, अखेर खासदार फुटले?

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर, अखेर खासदार फुटले?

| Updated on: Jun 18, 2026 | 12:33 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या स्वतंत्र भूमिकेच्या चर्चांदरम्यान पक्षाने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या व्हीपनंतरही काही खासदार बैठकीस अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाने आज सकाळी 11 वाजता संसदीय कार्यालयात खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. बैठकीदरम्यान राज्यसभेतील एक आणि लोकसभेतील काही खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश होता.

दरम्यान, काही खासदार बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय (बंडू) जाधव, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर हे बैठकीस उपस्थित राहिले नाहीत.

या पार्श्वभूमीवर पक्षाकडून पुढील कायदेशीर किंवा संघटनात्मक कारवाईचा विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, स्वतंत्र गटाच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, पुढील काही दिवसांत या घडामोडींना कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 18, 2026 12:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us