AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेवर एकतर्फी निर्णय? उद्धव गट दिल्ली हायकोर्टात, याचिकेतले 5 महत्त्वाचे मुद्दे

आज ही याचिका मेंशन केली आहे. उद्या दिल्ली हायकोर्टात ही याचिका सुनावणीसाठी येईल, असं ते म्हणाले.

शिवसेनेवर एकतर्फी निर्णय? उद्धव गट दिल्ली हायकोर्टात, याचिकेतले 5 महत्त्वाचे मुद्दे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2022 | 11:52 AM
Share

संदीप राजघोळकर, नवी दिल्लीः शिवसेनेचं (Shivsena) पक्ष चिन्ह गोठवण्यात निवडणूक आयोगाने (Election Commission) घाई केली, एकतर्फी निर्णय दिला, असा आरोप करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आज कोर्टात गेला आहे. या गटाचे नेते अनिल देसाई यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला. निवडणूक आयोगाने हा निर्णय देण्याआधी आमची बाजू ऐकून घ्यायला हवी होती, अशी मागणी उद्धव ठाकरे गटातर्फे या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

अनिल देसाईंनी आज दिल्ली हायकोर्टात ही याचिका दाखल केली. उद्या कोर्टाच्या कामकाजात ही याचिका पटलावर येण्याची शक्यता आहे. अनिल देसाईंनी याचिकेत काय म्हटलंय यातील 5 महत्त्वाचे मुद्दे-

  1.  निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशानुसार, आम्ही पक्षाचं नवीन नाव आणि चिन्हासाठीचे तीन पर्याय सादर केले आहेत. मात्र हा निर्णय़ देण्यात आयोगाने घाई केली, असे आम्हाला वाटते.
  2.  प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसला कुठेतरी बाधा येणारा निर्णय वाटतोय, असे आमचे मत आहे.
  3. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. घटनाक्रम लक्षात घेता, यात काहीतरी चुकीचं होतंय, असं वाटतंय. शनिवारी सर्व कागदपत्र मागवले. ते निवडणूक आयुक्तांसमोर शनिवारीच सादर केले आणि शनिवारी रात्रीच निर्णय दिला.
  4. आमची अपेक्षा होती की, याला काही पास्ट रेफरन्स पाहता, आम्हाला आमचं म्हणणं मांडू देण्याची गरज होती. किंवा आयोगामार्फत काही विचारणा करण्याची गरज होती. तसं काहीही न करता अंतरिम आदेश दिलाय. यासंदर्भात आम्ही याचिका दाखल केली आहे.
  5. आज ही याचिका मेंशन केली आहे. उद्या दिल्ली हायकोर्टात ही याचिका सुनावणीसाठी येईल, असं ते म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.