KDMC तील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिंदेंच्या कार्यकत्यांवर थेट कारवाईचा इशारा, श्रीकांत शिंदेंची पोस्ट चर्चेत

KDMC तील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिंदेंच्या कार्यकत्यांवर थेट कारवाईचा इशारा, श्रीकांत शिंदेंची पोस्ट चर्चेत

| Updated on: Jul 08, 2026 | 2:15 PM

कल्याण-डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रसूतीसाठी आलेल्या एका महिला रुग्णाच्या उपचारावरून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर आणि नर्स यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

घटनेनंतर विविध स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींवर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत ट्विटर(X) वर पोस्ट केली आहे.

डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी हे दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी काम करत असतात. त्यांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा आदर राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. एक डॉक्टर असल्याने याची मला चांगलीच जाण आहे.

Published on: Jul 08, 2026 2:15 PM
Follow Us