Sujat Ambedkar यांचा Raj Thackeray यांच्यावर निशाणा

Sujat Ambedkar यांचा Raj Thackeray यांच्यावर निशाणा

| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 8:17 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा मुलगा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही. त्यांची जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीनं राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणीही सुजात आंबेडकर यांनी केलीय.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. इतकंच नाही तर मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुनही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे काढावेच लागतील. अन्यथा त्यांच्या भोग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, असा आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलाय. अशावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा मुलगा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही. त्यांची जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीनं राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणीही सुजात आंबेडकर यांनी केलीय.