डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा… भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत

डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा… भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत

| Updated on: Aug 16, 2026 | 1:16 PM

अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम डांबराच्या तुटवड्यामुळे रखडले असल्याचा दावा माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. या परिस्थितीसाठी त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीतील धरसोड वृत्तीला जबाबदार धरले आहे. युद्धामुळे डांबर मिळत नसून, दिल्लीतून ते आणावे लागत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा खर्च अडीच पटीने वाढल्याचे विखे-पाटील यांनी नमूद केले.

अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम जागतिक युद्धामुळे रखडले असून, डांबराच्या तुटवड्याचा फटका त्याला बसला आहे, असा दावा माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. डांबर आता दुसरीकडूनच आणावे लागत असून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार युद्धनीतीमुळेच कामं रखडलीत असं त्यांनी सांगितलं. पुढे, “यांच्यासारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही” असे मिश्किल वक्तव्य त्यांनी केले.

राहुरी येथे एका कार्यक्रमात बोलताना सुजय विखे-पाटील यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या युद्धनीतीतील धरसोड वृत्तीमुळे रस्त्यांच्या कामांवर थेट परिणाम होत आहे. युद्धामुळे इतर देशांकडून डांबर मिळत नाही, याचा परिणाम म्हणून कंत्राटदाराला दिल्लीतून डांबर मागवावे लागत आहे. यामुळे रस्त्याच्या कामाची किंमतही अडीच पटीने वाढली आहे. हे तांत्रिक मुद्दे असून, वाढलेल्या किमतीला मंजुरी घ्यावी लागत आहे. डॉ. सुजय विखे-पाटील त्यांच्या मिश्किल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवरही भाष्य करत म्हटले की, “मी मेंदूचा डॉक्टर झालो, पण माझा मेंदू खराब झाला आणि मी राजकारणात आलो.” तरीही, हा रस्ता पूर्ण करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

Published on: Aug 16, 2026 1:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us