शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले अन्… रडारवर कोणता मंत्री?

शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले अन्… रडारवर कोणता मंत्री?

| Updated on: Aug 03, 2026 | 3:36 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मंत्र्यांकडून गेल्या सहा महिन्यांतील कामांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे आता मंत्र्यांना त्यांच्या विभागातील कामांचा हिशोब सादर करावा लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मंत्र्यांकडून गेल्या सहा महिन्यांतील कामांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे आता मंत्र्यांना त्यांच्या विभागातील कामांचा हिशोब सादर करावा लागणार आहे. या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांकडून कामाचा हिशोब घेतला होता. यावेळी त्यांच्या रडारवर शिक्षण खातं असल्याच्याही चर्चा आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केवळ कागदावरील कामांपेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर किती कामे झाली, यावर सुनेत्रा पवार यांचा भर असल्याचे दिसत आहे. नागरिकांना दिसणाऱ्या विकासकामांचा आणि सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांमध्येही या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.

सुनेत्रा पवार यांनी मंत्र्यांना त्यांच्या कामाबाबत स्पष्ट सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी मंत्र्यांकडून सहा महिन्यांचा अहवाल मागितला आहे. प्रत्यक्ष जमिनीवर दिसाणाऱ्या कामांचा हिशोब द्यावा लागेल असा इशारा दिला आहे.

Published on: Aug 03, 2026 3:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us