Big Breaking | फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात मोठी खळबळ; काय चर्चा झाली?
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे पक्षात नाराज असल्याचे समजते. ते पक्षात नेमके कोणत्या पदावर आहेत यावरून चर्चा सुरू आहे. सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत पक्षाविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचल्याचे म्हटले जाते.
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे पक्षात नाराज असल्याचे समजते. ते पक्षात नेमके कोणत्या पदावर आहेत यावरून चर्चा सुरू आहे. सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत पक्षाविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचल्याचे म्हटले जाते. पार्थ पवार यांच्यावर त्यांची नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. तटकरे हे एकटेच शरद पवार यांच्या भेटीला गेले नव्हते, तर त्यांच्यासोबत आणखी एक बडा नेता असल्याचं सांगितलं जात होतं.
आता हा बडा नेता कोण यावरून पडदा सरकला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फक्त सुनील तटकरेच नाही, तर प्रफुल्ल पटेलांनीही शरद पवारांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक गोष्टींबाबत तक्रार केली आणि व्यथा मांडली. या आधीच रोहित पवारांनी तटकरेंसह आणखी एक बडा नेता भेटल्याचा दावा केला होता. आता या भेटीनंतर पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
