SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 10 September 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 10 September 2021

| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 8:33 AM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याबद्दल पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून लूकआऊट सर्क्युलर काढण्यात आलं आहे. एअरपोर्ट अथॉरिटीला हे सर्क्युलर बजावण्यात आलं आहे. त्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याबद्दल पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून लूकआऊट सर्क्युलर काढण्यात आलं आहे. एअरपोर्ट अथॉरिटीला हे सर्क्युलर बजावण्यात आलं आहे. त्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्ज खातं मुंबईतील बँकेत आहे, मग पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस का बजावली? पाच महिने आधी लोन सेटलमेंटसाठी बँकेला पत्र देऊनही आता ही नोटीस का बजावण्यात आली? असे प्रश्न नितेश राणेंनी विचारले आहेत.

पाच महिने अगोदर आम्ही संबंधित बँकेला पत्र दिलं होतं की आम्हाला हे कर्ज सेटलमेंट करायचं आहे. बँकेकडे ते पत्र आहे. मग आता अशा पद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा हा की आमचं हे लोन अकाऊंट मुंबईच्या बँकेत आहे. मग, पुणे पोलिसांनी हे सर्क्युलर का काढलं? जर एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला लोन सेटलमेंट करायचं असेल तर अशापद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थच नाही. हा पूर्ण राजकारणाचा भाग आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय.

Published on: Sep 10, 2021 08:33 AM