SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 5 July 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 5 July 2021

| Updated on: Jul 05, 2021 | 8:57 AM

मराठा समाजाचे प्रश्न हे एका तासात निकाली लागू शकतात. पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे आहे. मात्र आम्हाला चर्चा किंवा वाद नको आहेत. त्यामुळे यावर पर्याय शोधा

मराठा समाजाचे प्रश्न हे एका तासात निकाली लागू शकतात. पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे आहे. मात्र आम्हाला चर्चा किंवा वाद नको आहेत. त्यामुळे यावर पर्याय शोधा,” असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. संभाजीराजे हे संवाद दौऱ्यानिमित्त अकोल्यात आले असताना त्यांनी मराठा आरक्षणावरुन चांगलीच टीका केली.

मराठा आरक्षणावर सद्यस्थितीत समाजाची भूमिका काय? याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या राज्याचा दौरा करत आहेत. काल ते मराठा समाज जनसंपर्क दौऱ्याच्या निमित्ताने अकोल्यात होते. यावेळी त्यांनी अकोल्यातील मराठा मंगल कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी सभेत समाजाशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला.

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे मला ते पद भोगू द्या. माझा जन्म हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशात झाला आहे. त्यामुळे कोण काय बोलतंय याकडे मी लक्ष देत नाही. मी कोणाला फसवणार सुद्धा नाही. अनेक जण शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर टीका करत आहेत. टीका करणारे करतात,” असेही संभाजी महाराज यावेळी म्हणाले.

Published on: Jul 05, 2021 08:57 AM