SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 27 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 8:20 AM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात होत आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जाणार आहे. आजपासून राणे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंना अपशब्द वापरला आणि त्यानंतर झालेला राडा सगळ्या देशाने पाहिला. आता हे सगळं पाठीमागे सोडून राणे पुन्हा एकदा जनआशीर्वाद घ्यायला बालेकिल्ल्यात जात आहेत. सिंधुदुर्ग तसंच कणकवली शहरात राणेंचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थकांनी कंबर कसलीय. योद्धा पुन्हा मैदानात, अशा आशायचे बॅनर्स शहरभर लागले आहेत. या बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राणेंचा फोटो आहे.

Follow Us