शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र…

शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र…

| Updated on: Aug 05, 2026 | 4:27 PM

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. 2022 मधील राजकीय घडामोडींचा क्रम त्यांनी न्यायालयासमोर मांडला.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. 2022 मधील राजकीय घडामोडींचा क्रम त्यांनी न्यायालयासमोर मांडला. विधानपरिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंगनंतर काही आमदार सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले, हा योगायोग नव्हता, असा दावा सिब्बल यांनी केला.

याच काळात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ नेतेपदावरून हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती केली. तसेच व्हिप म्हणून सुनील प्रभूंनी आमदारांची बैठक बोलावली होती, असेही सिब्बल यांनी सांगितले.

शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली होती. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाची सूत्रे स्वीकारली आणि पक्षघटनेनुसार उपनेत्यांची नियुक्ती केली, असा युक्तिवाद करण्यात आला. विधिमंडळात पद देण्याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असल्याचेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. हा निर्णय आमदार सुरत आणि गुवाहाटीत असताना राज्याबाहेर झाला, असा दावा करण्यात आला. या घटनांमुळे लोकशाहीवर आघात झाला असून दहाव्या अनुसूचीनुसार प्रक्रिया झाली नाही, असा युक्तिवादही सिब्बल यांनी केला.

Published on: Aug 05, 2026 4:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us