Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो

Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो

| Updated on: Jun 28, 2026 | 10:55 AM

राष्ट्रवादी (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भावूक पोस्ट शेअर करत दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भावूक पोस्ट शेअर करत दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया अकाऊंटवर “दादा मिस यू” असे कॅप्शन लिहित अजित पवार यांच्यासोबतचा एक खास फोटो पोस्ट केला. 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यानंतर गेल्या 5 महिन्यांपासून सुप्रिया सुळे सातत्याने त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.

अजित पवार यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याच्या भावना त्यांनी यापूर्वीही अनेकदा मांडल्या आहेत. आज शेअर करण्यात आलेल्या पोस्टमुळे कार्यकर्ते आणि समर्थकही भावूक झाले असून सोशल मीडियावर या पोस्टची मोठी चर्चा रंगली आहे.

Published on: Jun 28, 2026 10:55 AM
Follow Us