एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच

एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच

| Updated on: Jul 11, 2026 | 4:00 PM

गेसल्या एका आठवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सत्ताधारी NDA सोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या बैठकीनंतर या चर्चांना आणखी वेग आला. त्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विधीमंडळ परिसरातील दालनात बैठक झाल्याची माहिती समोर आली आणि राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले.

गेल्या एका आठवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सत्ताधारी NDA सोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या बैठकीनंतर या चर्चांना आणखी वेग आला. त्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विधीमंडळ परिसरातील दालनात बैठक झाल्याची माहिती समोर आली आणि राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले.

या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चांवर मिश्कील टिप्पणी केली. बातम्या देणाऱ्या सूत्रांवर कोपरखळी मारताना त्या म्हणाल्या की, “हे सूत्र आम्हाला रोज एका नवीन पक्षात पाठवत आहेत. फक्त मनसेमध्ये त्यांनी अद्याप आम्हाला पाठवले नाही.”

यावेळी त्यांनी, “आता ट्रम्प यांच्या नेतृत्वात काम करू, असा जोक मी आमच्या एका ग्रुपमध्ये पाठवला होता,” असेही सांगितले. “फुटण्यासाठी आम्ही निवडून आलो नाही, तर पॉलिसी ठरवण्यासाठी आम्ही निवडून आलो आहोत,” असेही त्या म्हणाल्या. गेल्या 2 दिवसांपासून या चर्चांमुळे आपण व्यथित असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: Jul 11, 2026 3:53 PM
Follow Us