बहिणीला सासरी सोडणारा भाऊ, आता ओवाळणी…,’ते’ दोन व्हिडीओ दाखवत सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

बहिणीला सासरी सोडणारा भाऊ, आता ओवाळणी…,’ते’ दोन व्हिडीओ दाखवत सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

| Updated on: Aug 13, 2024 | 5:35 PM

लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचा लाव रे तो व्हिडीओ.... लाडकी बहीण योजनेवरूनच शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यावर सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी महेश शिंदे आणि त्यानंतर रवी राणा यांच्या भाषणाचाच एक व्हिडीओ सभेत उपस्थितांना ऐकवला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांचं थेट भर सभेत लाव रे तो व्हिडीओ….बघायला मिळाले. लाडकी बहीण योजनेवरूनच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यावर सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी महेश शिंदे यांच्या भाषणाचाच एक व्हायरल होणारा व्हिडीओ सभेत उपस्थितांना ऐकवला आहे. या व्हिडीओमध्ये डिसेंबरनंतर योजनेचे पैसे मिळणार नाही, असं महेश शिंदे म्हणताना दिसताय. १५०० रूपये नको तर मराठा आरक्षण द्या, असा मेसेज एका व्यक्तीने महेश शिंदे यांना व्हॉट्सअप केला. दरम्यान, यानंतर योजनेतून तुझं नाव डिलीट करतो, असं म्हणत महेश शिंदे यांनी फोन करून त्या व्यक्तीला चांगलंच सुनावलं आहे. यावरूनच सुप्रिया सुळे यांनी महेश शिंदेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी रवी राणांचा ऐकवला. यामध्ये रवी राणा म्हणताय, ‘तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या, ज्यांनी आशीर्वाद दिले नाहीत त्यांच्या खात्यातून १५०० रूपये काढून घेणार’, असं रवी राणा खोचकपणे बोलताना दिसताय, यावरूनच सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीकास्त्र डागलंय.

Published on: Aug 13, 2024 05:35 PM