Chennai Election Results | तमिळनाडूत राजकीय उलथापालथ; टीव्हीके सर्वात मोठा पक्ष, डीएमकेला मोठा धक्का

Chennai Election Results | तमिळनाडूत राजकीय उलथापालथ; टीव्हीके सर्वात मोठा पक्ष, डीएमकेला मोठा धक्का

| Updated on: May 04, 2026 | 11:35 AM

आज पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला उत्साहात सुरुवात झाली असून, देशभराचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या महत्त्वाच्या पोटनिवडणुकांचे निकालही आज जाहीर होत आहेत.

तमिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. राज्यातील सत्ताधारी डीएमके पक्षाला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. विशेषतः चेन्नईसारख्या बालेकिल्ल्यातही डीएमके पिछाडीवर असल्याचे दिसत आहे, ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार डीएमके सुमारे 50 जागांवर, तर एआयडीएमके सुमारे 78 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्षाने 103 जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतल्याचे चित्र दिसत आहे.
मुख्यमंत्री स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमकेला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळताना दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सुरुवातीच्या कलांनुसार राज्यात सत्ताबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: May 04, 2026 11:35 AM
Follow Us