Shivsena UBT : ‘.. असा पोरकटपणा फक्त उबाठाचे लोकच करू शकतात’; ‘त्या’ क्लिपवर बावनकुळेंनी ओढले ताशेरे
Video Clip In Balasaheb Thackeray's Voice : नाशिकच्या ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातून भाजप आणि शिंदे सेनेवर टीका करणारी ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली. त्यावर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
नाशिकमध्ये ठाकरेंच्या निर्धार शिबिरात बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात क्लिप ऐकवण्यात आली आहे. या व्हिडीओमधून भाजप आणि शिंदेंवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजप हिंदुत्वाचे खरे मारेकरी आहेत, अशी टीका भाजपवर केली आहे. तर गद्दार दिल्लीमध्ये मुजरे झाडत आहेत, अशी टीका शिंदेंच्या शिवसेनेवर करण्यात आली आहे.
दरम्यान, या क्लिपवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडून दिल्या जात आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर ट्विट करत म्हंटलं आहे की, वंदनीय बाळासाहेब असते तर त्यांनी यावर लाथच मारली असती. धिक्कार! आपला आवाज कोणी ऐकत नाही म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करू शकतो, अशा आशयाचं ट्विट बावनकुळे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर करत ठाकरे गटावर ताशेरे ओढले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

